माजी मंत्र्याच्या अडचणीत वाढ, जप्त होणार संपत्ती !

माजी मंत्र्याच्या अडचणीत वाढ, जप्त होणार संपत्ती !

नागपूर – बँकेचे कर्ज थकवल्याप्रकरणी माजी मंत्र्याच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांची संपत्ती जप्त केली जाणार असल्याची माहिती आहे. माजी मंत्री रणजित देशमुख यांनी आयडीबीआय बँकेचे ५ कोटी ७० लाख रुपयांचे कर्ज थकवले आहे. त्यामुळे त्यांची मालमत्ता जप्त होणार असल्याची माहिती आहे. आयडीबीआय बँकेने देशमुख यांना २० तारखेपर्यंत पैसे भरण्याची मुदत दिली असून दिलेल्या मदतीत जर पैसे भरले नाही तर त्यांची संपत्ती जप्त केली जाणार असल्याचं बँकेनं म्हटलं आहे.


रणजित देशमुख यांनी आपली मालमत्ता गहाण ठेवून आयडीबीआय बँकेकडून ५ कोटी ७० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. तसेच त्यांनी कर्जाची परतफेड नियमित स्वरुपात केली नसल्याची माहिती बँकेनं दिली आहे. रणजित देशमुख यांच्याकडे ५ कोटी ७० लाख रुपये बँकेची थकबाकी आहे. तसेच वारंवार नोटीस बजावूनही त्यांनी परतफेड न केल्यामुळे त्यांची सपत्ती जप्त केली जाणार असल्याचं बँकेनं म्हटलं आहे. तसेच रणजित देशमुख यांनी बँकेकडे गहाण ठेवलेली मालमत्ता नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत येते. त्यामुळे हे प्रकरण जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे गेले होते. जिल्हादंडाधिकारी यांना रणजित देशमुख यांची मालमत्ता जप्त करुन आयडीबीआय बँकेला हस्तांतरीत करायची आहे. त्यानुसार येत्या २० तारखेला जिल्हा प्रशासन ही कारवाई करणार असल्याची माहिती आहे.

COMMENTS