पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफांना 10 वर्षांचा तर मुलीला 7 वर्षांचा तुरुंगवास !

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफांना 10 वर्षांचा तर मुलीला 7 वर्षांचा तुरुंगवास !

कराची –  पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी शरीफ यांच्यासह त्यांची मुलगी आणि मुलाला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पाकिस्तान न्यायालयान शरीफ यांना १० वर्षांच्या तुरुंगवासाची तर त्यांची मुलगी मरियमला ७ वर्षांची तर त्यांच्या मुलाला एक वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली असल्याची माहिती आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे.

दरम्यान लंडनमधील बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी कोर्टाने नवाज शरीफ यांना ८० लाख पाऊंडचा दंड  आणि त्यांच्या मुलीला अर्थात मरियमला २ लाख पाऊंडचा दंड ठोठावण्यात आला आहे. एवनफिल्ड हाऊसमधील ४ घरांच्या खरेदी संदर्भातला हा घोटाळा असून पाकिस्तानच्या अकाऊंटिबिलिटी कोर्टाने नवाज शरीफ आणि त्यांच्या मुलीला भ्रष्टाचार प्रकरणात ही शिक्षा सुनावली आहे. लंडनमध्ये नवाज शरीफ यांनी बेकायदेशीररित्या मालमत्ता खरेदी केली होती.

तसेच पनामा पेपर प्रखरणी मागील वर्षी पाकिस्तानच्या उच्च न्यायालायाने निर्णय दिल्यावर नॅशनल अकाऊंटिबिलिटी ब्युरोने कोर्टात याचिका दाखल केली होती. पनामा पेपर प्रकरणात आलेल्या निर्णयानंतर शरीफ यांना त्यांचे पंतप्रधानपद गमवावे लागले होते. त्यानंतर आता त्यांना दहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आल्यामुळे शरीफ यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली असल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS