नवी दिल्ली – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती केली आहे. शेतकरी नेते राम शकल, लेखक राकेश सिन्हा, शिल्पकार रघुनाथ महापात्रा आणि क्लासिकल डान्सर सोनल मानसिंह या चौघांना राष्ट्रपतींनी राज्यसभेत खासदार म्हणून नियुक्त केलं आहे.
अभिनेत्री रेखा आणि मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सामाजिक कार्यकर्त्या अनू आगा यांचा कार्यकाळ संपल्यामुळे या चौघांची राज्यसभेत नियुक्ती करण्यात आली आहे.
राम शकल (समाजसेवा) राज्य- उत्तरप्रदेश शिक्षण- एमए
राम शकल यांनी दलित आणि मागासवर्गीय समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे कार्य केलं आहे.
गेल्या चाळीस वर्षांपासून शेतकरी, मजूर वर्ग आणि प्रवासी यांच्या हितासाठी ते कार्यरत आहेत.
सोनल मानसिंह- क्लासिकल डान्सर, शिक्षण- डिलिट, डिएसी, बीए ऑनर्स
सोनल मानसिंह या भारतातील प्रमुख शास्त्रीय नृत्यांगनांपैकी एक आहेत. त्या गेल्या ६ दशकांपासून भरतनाट्यम आणि ओडिसी नृत्य सादर करतात. कोरियोग्राफर, शिक्षक, वक्त्या आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख असून त्यांना पद्मविभूषण आणि पद्म भूषण या दोन्ही पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.
राकेश सिन्हा (राज्य-बिहार शिक्षण- पीएचडी, एम फिल)
राकेश सिन्हा हे सुप्रसिद्ध लेखक असून ते दिल्ली विद्यापीठाच्या एका महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.
रघुनाथ महापात्रा ( शिल्पकार राज्य-ओदिशा)
रघूनथा महापात्रा यांची शिल्प गुरु म्हणून ओळख आहे. दगडाला आकार देऊन त्यातून शिल्प घडवण्याची कला त्यांना अवगत आहे. त्यांनी प्राचीन मूर्ती, स्मारके यांच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे कार्य केले असून ते ओदिशा ललित कला अकादमीचे अध्यक्ष आहेत. त्यांना पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री या तिन्ही पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.
COMMENTS