राज्यातील युतीच्या महत्त्वपूर्ण घडामोडीपासून नितीन गडकरींना दूर ठेवण्याचा डाव कुणाचा ?

राज्यातील युतीच्या महत्त्वपूर्ण घडामोडीपासून नितीन गडकरींना दूर ठेवण्याचा डाव कुणाचा ?

नागपूर – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपमध्ये युती झाली. या युतीच्या चर्चेपासून भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना अलिप्त ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत. राज्यातील युतीच्या महत्त्वपूर्ण घडामोडीपासून त्यांना दूर ठेवण्याचा ‘डाव’ कुणाचा असा सवाल भापमधील काही कार्यकर्ते करत आहेत.

दरम्यान यापूर्वी युतीचे संबंध ताणले गेले तेव्हा भाजपकडून लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे हे शिष्टाई करायचे. डॅमेज कंट्रोल करणाऱ्या नेत्यांमध्ये नितीन गडकरींचाही समावेश होता. पहिल्या युतीच्या सत्तेच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची गडकरी यांच्यावर मेहरनजर होती.

परंतु काही दिवसांपूर्वी गडकरी यांच्या कामाचं कौतुक काँग्रेसकडून करण्यात आलं होतं. त्यामुळे गडकरी आणि काँग्रेसची जवळीकता पाहून विविध तर्कवितर्क लावले जात होते. भाजपमध्येही नाराजी पसरली असल्याची चर्चा होती. त्यामुळेही गडकरींना या चर्चेपासून अलिप्त ठेवण्यात आल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS