त्यामुळे ही आघाडी फार काळ टिकू शकणार नाही – नितीन गडकरी

त्यामुळे ही आघाडी फार काळ टिकू शकणार नाही – नितीन गडकरी

मुंबई – शिवसेना आणि भाजपची युती हिंदुत्वावर आधारित होती. ही युती तुटणं हिंदुत्वासाठी आणि मराठी माणसासाठी नुकसानदायक होतं. मात्र आता जी महाआघाडी झाली आहे ती संधीसाधूपणासाठी झाली आहे. त्यामुळे ही आघाडी फार काळ टिकू शकणार नाही. ही महाआघाडी महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ शकणार नसल्याचं भाजप नेते नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राज्यात लवकरच शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस म्हणजेच महाविकासघाडीचं सरकार स्थापन होणार आहे. तिन्ही पक्षांची बोलणी जवळपास निश्चित झाली असल्याचं चित्र आहे. परंतु अशातच आता भाजपनं शिवसेनेला नवा प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती आहे.
शिवसेनेला सुरुवातीची अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्याची तयारी भाजपने दर्शविली असल्याची माहिती आहे. यासंदर्भात भाजपच्या दिल्लीतील एका बड्या नेत्याने ‘मातोश्री’शी संपर्क साधला अशी माहिती आहे.

परंतु यावर आज संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली शिवसेनेने महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद हे स्वत:च्या ताकदीवर राज्याच्या स्वाभिमानासाठी स्वत: जवळ ठेवलं आहे. त्यामुळे कुणी आम्हाला इंद्राचं आसन जरी दिलं तरी ते आता आम्हाला नकोय असं राऊत म्हणाले आहेत.

COMMENTS