उस्मानाबाद – खासदार रवींद्र गायकवाडांची पोलिसात तक्रार, ओमराजेंविरोधात गुन्हा दाखल!

उस्मानाबाद – खासदार रवींद्र गायकवाडांची पोलिसात तक्रार, ओमराजेंविरोधात गुन्हा दाखल!

उस्मानाबाद – उस्मानाबादमधील शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात उमरगा पोलीस स्टेशनमध्ये अब्रुनुकसानीची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन पोलिसांनी ओमराजेंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. खासदार रवींद्र गायकवाड यांनी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना यासंदर्भात निवेदन दिले असून ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणीही केली आहे. त्यामुळे उस्मानाबादमध्ये राजकीय वातावरण तापलं असल्याचं दिसत आहे.

दरम्यान ओमराजे निंबाळकर यांनी एक आक्षेपार्ह व्हिडीओ क्लिप बनवून ती व्हाट्सअॅपवर व्हायरल केल्याचा आरोप रवींद्र गायकवाड यांनी केला आहे. यामुळे आपली बदनामी झाली असून राजकीय प्रतिमाही मलीन झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यानुसार, ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात अब्रुनुकसानीच्या दाव्यासह माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

COMMENTS