गौतम गंभीर यांच्या अडचणीत वाढ,निवडणूक आयोगाकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश !

गौतम गंभीर यांच्या अडचणीत वाढ,निवडणूक आयोगाकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश !

नवी दिल्ली – माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे पूर्व दिल्लीतील उमेदवार गौतम गंभीर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गंभीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
गौतम गंभीर यांच्या विरोधात दोन वेळा मतदान यादीत नाव असल्याच्या मुद्द्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यांनतर आता परवानगी न घेता प्रचारसभेचे आयोजन केल्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान गौतम गंभीर यांचे नाव मतदार यादीत दोन ठिकाणी असल्याच्या आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. याबाबत आपने त्यांच्याविरोधात दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. तसेच पूर्व दिल्लीमधून गंभीरने शुक्रवारी कोणतीही परवानगी न घेता प्रचारसभा घेतली होती.

या विरोधात निवडणूक आयोगाकडे इतर पक्षांकडून तक्रार करण्यात आली होती. त्याची आयोगाने गंभीर दखल घेत दिल्लीतील निवडणूक अधिकाऱ्यांना गंभीर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. १ मे रोजी याबाबत सुनावणी होणार असून आता न्यायालय काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS