नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, रवीशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत गौतम गंभीर याने भाजपात प्रवेश केला आहे. तसेच गंभीरला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. परंतु गौतम गंभीरला लोकसभा निवडणुकीचं तिकीट देण्यासंबंधी बोलण्यास अरुण जेटली यांनी नकार दिला असून तिकीट देण्यासंबंधीचा निर्णय निवडणूक समितीवर सोडून दिला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान नरेंद्र मोदींच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपात प्रवेश केला असल्याचं गौतम गंभीरने म्हटलं आहे. गौतम गंभीरने भाजपात प्रवेश केल्याने पक्षाला नक्कीच फायदा होईल असा विश्वास अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे.
COMMENTS