पुणे – पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून पालकमंत्री गिरीश बापट, तर काँग्रेसकडून मोहन जोशी रिंगणात आहेत. येत्या 23 एप्रिल रोजी पुण्यात मतदान होणार आहे. या मतदानाच्या तोंडावरच गिरीश बापट यांना पुणेकरांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. गेली पाच वर्षांपासुन पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहणाय्रा गिरीश बापट यांना पाणी प्रश्नावरून पुणेकरांनी चांगलंच घेरलं. बापट हे पुण्यातल्या कॅम्प परिसरात प्रचार करत असताना तेथील नागरिकांनी बापट यांना पाण्याची समस्याकधी सुटणार असा सवाल केला.
यावेळी गिरीश बापट यांची चांगलीच भांबेरी उडाली.
सर्वात मोठी गरज असलेल्या पाण्याची समस्या सुटत नसेल तर आम्हा का आणि कुणाला मतदान करायचं असा सवाल या नागरिकांनी विचारला. नागरिकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे गिरीश बापट गोंधळून गेले. नागरिकांना नक्की काय उत्तर द्यावे असा प्रश्न त्यांना पडला आणि त्यांनी थातूरमातूर उत्तर देत नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिक प्रचंड वैतागले होते. त्यामुळे यावेळी बापट यांच्या तोंडचे पाणी पळाले असल्याचे दिसून आले.
COMMENTS