पुण्यातील लॉकडाऊनला गिरीश बापटांचा विरोध, “…तर काय करायचं हे आम्ही ठरवू !”

पुण्यातील लॉकडाऊनला गिरीश बापटांचा विरोध, “…तर काय करायचं हे आम्ही ठरवू !”

पुणे – पुण्यातील लॉकडाऊनला
भाजप खासदार गिरीश बापट यांनी विरोध केला आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी फक्त अधिकाऱ्यांशी चर्चा केली. लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेतले नाही. हम करे सो कायदा असून हे बरोबर नाही असं वक्तव्य बापट यांनी केलं आहे. तसेच केवळ चार टक्के बाधित रुग्णांसाठी 96 टक्के लोकांना वेठीस धरणे चुकीचं आहे. असे एकतर्फी निर्णय जर पुढे घेण्यात आले तर काय करायचं हे आम्ही ठरवू, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

दरम्यान या लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार पुन्हा बुडणार आहे. सरकारनं बारा बलुतेदारांना काहीच पॅकेज दिलं नाही. यामुळे उपासमारीची भीती असून, सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करायला पाहिजेत. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून योग्य अंमलबजावणी होऊ शकते. मात्र त्यांना विश्वासात घेतलं जात नाही. केवळ दिवस पुढे ढकलल्याने संख्या कमी होणार नाही. सर्व पुणे शहराला वेठीस धरले जात असल्याची टीकाही बापट यांनी केली आहे. तसेच केंद्रात नरेंद्र मोदींनी सर्व विरोधी पक्षनेत्यांना बोलवलं, त्यांचा सल्ला घेतला. मात्र तसं पुण्यात होत नसून, मनमानी कारभार सुरु असल्याची टीकाही बापट यांनी केली आहे.

COMMENTS