मुंबई- पुणे शहरात पाणी कपात केली जाणार असल्याची चर्चा सुरु होती. परंतु याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याची माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली आहे. मंत्रालयातील कालवा समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला असल्याचं गिरीश बापट यांनी म्हटलं आहे. अजून 15 दिवस परतीचा पाऊस आहे. सध्या पुण्याला 1350 एमएलडी पाणी दिलं जातं. 15 दिवस वाट बघून पाऊस पडला नाही तरच त्यात कपात करून दोन वेळा 1200 एमएलडी पाणी देणार असल्याचंही गिरीश बापट यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुणे ग्रामीण भागातील शेतीला पाणी दिलं जातं, त्या कालव्यावर असणा-या अनधिकृत मोटारींवर कारवाई केली जाणार असल्याची माहितीही बापट यांनी दिली आहे. तसेच या मोटारी जप्त केल्या जाणार, त्यामुळेही पाण्याची बचत होईल आणि तेच पाणी नागरिकांसाठी वापरता येईल असंही गिरीश बापट यांनी म्हटलं आहे.
COMMENTS