गिरीश महाजन, राजू शेट्टींच्या भेटीनंतरही आंदोलन सुरुच !

गिरीश महाजन, राजू शेट्टींच्या भेटीनंतरही आंदोलन सुरुच !

मुंबई – दूध दरवाढीच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी बुधवारी रात्री राज्य सरकारच्यावतीने गिरीश महाजन यांनी राजू शेट्टी यांची भेट घेतली. मात्र, या भेटीत तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे आज चौथ्या दिवशीही राज्यभरात शेतक-यांचं आंदोलन सुरुच आहे. हक्काचे पैसे मिळेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याची भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे. तर दूध उत्पादकांच्या मागणीसंदर्भात सरकार अनुकूल असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दूध दरवाढीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी मुंबई आणि पुण्यात होणाऱ्या दूध पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. पुण्यात चितळे समुहाचे दूध वितरण आज बंद असून मुंबईतील काही भागांमध्ये दुधाचे टँकर पोहोचू शकलेले नाहीत. दरम्यान आज दुपारी नागपूरमध्ये विधानसभा अध्यक्षांच्या दालनात याबाबत बैठक होणार आहे. या बैठकीत आंदोलनावर तोडगा काढण्यासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रति लीटर पाच रुपये दरवाढ मिळणार का याकडे लक्ष लागलं आहे.

 

 

COMMENTS