मुंबई – कोल्हापूर आणि सांगलीमध्ये महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. घरात पाणी घुसल्यामुळे अनेक नागरिक बेघर झाले आहेत तर अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना मदत करण्यासाठी सरकार आणि अनेक संस्था, सामाजिक कार्यकर्ते याठिकाणी दाखल झाले आहेत कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी केली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी देखील या पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे. या पूरग्रस्त भागाची पाहणी करतानाचा महाजनांचा एक व्हिडीओ आमच्या हाती लागला आहे. या व्हिडीओमध्ये बोटीमध्ये बसलेले महाजन हे कॅमेय्राकडे पाहून हातवारे करत आहेत. तसेच काही काळ ते मोबाईलमध्येही व्यस्त असल्याचे पहावयास मिळाले. एकीकडे कोल्हापूर, सांगलीतील नागरिक संकटात आहेत. त्यांच्यावर मोठे दु:ख पसरले आहे. परंतु अशातच महाजनांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे ते पूर पाहणी करत आहेत की पूर पर्यटण करत आहेत असाच सवाल आता विचारला जात आहे.
COMMENTS