उस्मानाबादमध्ये मेडिकल कॉलेज देण्याचा विचार – गिरीष महाजन

उस्मानाबादमध्ये मेडिकल कॉलेज देण्याचा विचार – गिरीष महाजन

नागपूर – उस्मानाबाद जिल्ह्याला मेडिकल कॉलेज देण्याबाबत सरकार विचार करत आहे असं आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी केलं. ते विधान परिषदेत बोलत होते. मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये मराठवाड्यावर अन्याय झाल्याचा मुद्दा मराठवाड्यातील आमदारांनी विधान परिषदेत उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सतिश चव्हाण, अमरसिंह पंडित, भाजपचे सुजितसिंह ठाकूर यांनी हा मुद्दा उपस्थित केला. यावरुन सभागृहात जोरदार वादंग झालं. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन हे तर आज चक्क विरोधकांसारखे वेलमध्ये आले. त्यावरुन विरोधकांनी त्यांना घेरलं. या चर्चेला उत्तर देताना गिरीष महाजन यांनी मराठवाड्यात उस्मानाबादला लवकरच मेडिकल कॉलेज देण्याचा विचार असल्याचं आश्वासन गिरीष महाजन यांनी केलं.

उस्मानाबादमध्ये मेडिकल कॉलेज झाल्यास नक्कीच उस्मानाबादसह मराठव्डायातील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. मात्र मेडिकल कॉलेज देण्याचा विचार सुरु असल्याचं आश्वासन मंत्रीमहोदयांनी दिलंय. हे आश्वासन हवेत विरणार नाही याची दक्षता मराठवाड्यातील लोकप्रतनिधींनी घेण्याची गरज आहे. आता सरकार याबाबत घोषणा कधी करणार, काम कधी सुरू होणार याकडे मराठवाड्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. इतर आश्वासनांप्रमाणे याही आश्वासनाचे होऊ नये एवढीच अपेक्षा…

COMMENTS