मुंबई – राज्यातील सरपंचांना मानधन देण्यासाठी सरकार सकारात्मक असून या सरपंचांना लवकरच ओळखपत्र देण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास, महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. राज्यातील सरपंचांनी आयोजीत केलेल्या सरपंच दरबारात त्या बोलत होत्या.
राज्यातील पहिल्यांदा निवडून आलेल्या तरुण सरपंचांची संख्या मोठी आहे. त्यांना गावांच्या विकासाबद्दल आणि शासनाच्या विविध योजनांविषयी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या गुरुवारी सरपंचासाठी वेळ राखून ठेवणार असून त्यांच्याशी सामाजिक माध्यमांद्वारे थेट संपर्क साधणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. सरपंच हा ग्रामविकासाचा पाया मजबूत करणारा महत्त्वाचा घटक असल्याने त्याच्याकडून गावाच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचंही त्या म्हणाल्यात.
गावात उत्पन्न वाढविण्यासाठी बीओटी तत्वावर व्यापारी संकुल बांधण्यासाठी परवानगी देता येणार आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या योजनेंतर्गत गावात ग्रामसचिवालय बांधण्यात येणार आहे. ज्यामध्ये गावातील तलाठी, ग्रामसेवक यांच्या कार्यालयासह इतर कार्यालये एकत्रित बांधण्यात येणार आहेत. राज्यातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या अनेक योजना अपूर्ण आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याबरोबर नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार आहे. विविध विकासकामे करण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा असून सरपंचांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे असंही पंकजा मुंडे यांनी त्यावेळी म्हटलं आहे.
#DGIPRNEWS मंत्रालयात ग्रामविकास मंत्री @Pankajamunde यांच्या उपस्थितीत आयोजित #सरपंच दरबाराला उत्तम प्रतिसाद. सरपंचांच्या मानधन वाढीसाठी शासन सकारात्मक, सरपंचांना देणार ओळखपत्र pic.twitter.com/f3NynpbWS0
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 7, 2017
COMMENTS