पणजी – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना कॅन्सर झाल्याचं नुकतच पक्षातर्फे सांगण्यात आलं. काल गोवा विधानसभेचे सभापती प्रमोद सावंत यांनी पर्रिकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्या भेटीचा फोटो एएनआय या वृत्तसंस्थेनं दिला आहे. पर्रिकर यांचा कालचा फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल. आपण पर्रिकर यांना टीव्हीत अनेवेळा पाहिलं आहे. नेहमी हसतमुख असणारे आणि काही महिन्यांपूर्वी धष्टपुष्ट दिसणारे पर्रिकर यांची अशी अवस्था झाली आहे.
देशाच्या राजकारणातेल पर्रिकर हे एक स्वच्छ प्रतिमेचे नेते आहेत. पण प्रकृतीकडे त्यांनी लक्ष दिले नाही. अंगावर आजार काढला. आणि आता तो बळावला आहे. आजारशी लढण्याचं बळ त्यांच्या निर्माण होवो, शरद पवार यांच्यासारखे ते त्याच्यावर मात करुन बाहेर येओ आणि लवकरात लवकर ते बरे होतोत एवढी सदिच्छा.
COMMENTS