पणजी – मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यातील राजकीय घडामोडींनाही वेग आला असल्याचं दिसत आहे. आज दुपारी काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी दावा केला आहे. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेतली असून या भेटीदरम्यान काँग्रेसनं सत्तास्थापनेचा दावा केला आहे.
Chandrakant Kavlekar, Congress: We met the Governor&staked claim to form government as we are the single largest party in the state. We have 14 MLAs and we should be given the chance to form the government. We have told that we will prove majority. Saddened by demise of Goa CM pic.twitter.com/vuBtmDd74M
— ANI (@ANI) March 18, 2019
दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे काल रात्री निधन झाले. त्यांच्या निधनानंतर गोव्यातील भाजपा सरकार देखील अडचणीत आले असून पर्रिकर आणि डिसोझा या दोन भाजपा आमदारांचे निधन तसेच दोघांचा राजीनामा यामुळे ४० सदस्यांच्या गोवा विधानसभेचे संख्याबळ ३६ वर आले आहे. त्यात काँग्रेसचे १४, तर भाजपचे १२ आमदार आहेत. त्यामुळे याठिकाणी काँग्रेसनं सत्तास्थापनेचा दावा केला आहे.
COMMENTS