पणजी – गोव्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या 10 पैकी तीन आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण चार आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. चंद्रकांत कवळेकर, फिलीप नेरी, जेनिफर मोन्सेरात यांच्यासह मायकल लोबो यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. कवळेकर यांची उपमुख्यमंत्रिपदी नियुक्त करण्यात आली आहे. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
Filipe Nery Rodrigues, Jennifer Monserratte, and Chandrakant Kavleka, three out of the ten MLAs who joined BJP from Congress recently, take oath as ministers in Goa Government. Former Deputy Speaker Michael Lobo also takes oath. pic.twitter.com/ns9PpK9CtA
— ANI (@ANI) July 13, 2019
दरम्यान तीन महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतलेल्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळात सहभागी असलेले गोवा फॉरवर्ड पार्टीचे तीन आणि अपक्ष रोहन खंवटे यांना डच्चू देण्याचा निर्णय घेतला. मंत्रिमंडळाच्या पहिल्या फेरबदलात त्यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री सुदीन धवळीकर यांना हटवून दीपक पुष्कर यांचा मंत्रिमंडळात समावेश केला होता. त्यानंतर आता कवळेकर यांची उपमुख्यमंत्रिपदी नियुक्त करण्यात आली आहे.
COMMENTS