मुंबई – गोव्याचे वीज मंत्री पांडुरंग मडकईकर यांना ह्रदयविकाराचा झटका आला असल्याची माहिती असून त्यांना मुंबईमधील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काही कामानिमित्त ते सोमवारी मुंबईमध्ये आले होते. यादरम्यान त्यांना मंगळवारी म्हणजेच आज सकाळी ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आहे. यादरम्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान गोव्यामध्ये सतत लोडशेडींग होत असल्यामुळे त्यांच्यावर काँग्रेसकडून जोरदार टीका करण्यात येत होती. उत्तर गोव्यामध्ये बराच वेळ लोडशेडींग करण्यात आल्यामुळे रविवारी काँग्रेसनं त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आलं होतं. यादरम्यान काही कामानिमित्त सोमवारी मुंबईत आले होते. परंतु अशातचं त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे. दरम्यान भाजपच्या नेत्यांकडून त्यांच्या प्रकृतीबाबत चौकशी केली जात आहे.
COMMENTS