मुंबई – गोंदिया-भांडाऱ्यात घेण्यात आलेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीतील 49 ठिकाणी पुन्हा मतदान घेण्यात येणार आहे.याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला असून ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीनच्या घोळामुळे निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आहे. दरम्यान सोमवारी मतदानादरम्यान ईव्हीएम मशीन बंद पडल्याची अनेक प्रकरणं पुढे आली आहेत. या पोटनिवडणुकीच्या मतदानावेळी तब्बल 450 ईव्हीएम मशीन्स बंद पडल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगानं चौकशी करुन हा निर्णय घेतला आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघ पोटनिवडणूक 2018 साठी खालील नमुद मतदान केंद्रावर फेरमतदान बुधवार, 30 मे 2018 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. फेरमतदान असणाऱ्या क्षेत्रात मतदान करण्यासाठी शासकीय सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे 30 मे रोजी कोरडा दिवस लागू करण्यात आला आहे.
याठिकाणी होणार फेरमतदान
61-भंडारा विधानसभा- 302- अडयाळ, 320नवेगाव, 318-उमरी, 335-पिंपळगाव, 403-पवनी, 405-पवनी, 374-खैरी दिवाण, 314-पिलांद्री, 317-केसलवाडा,322-पाथरी पुर्नवसन, 362-लोणारा, 363-लोणारा, 428-वलनी, 429-वलनी एकूण 14 केंद्र.
62- साकोली विधानसभा-306-पारडी, 316-मुरमाडी, 292-तई बु., 287- घोडेझरी एकूण 4 केंद्र.
63-अर्जुनी मोर विधानसभा-108-बोथली, 159-मानेरी एकूण 2 केंद्र.
64-तिरोडा विधानसभा- 45-अत्री, 97-दवनीवाडा, 102-पिपरटोला, 108-विहीरगाव, 205- भजेपार, 215-पिंडकेपार, 38-मुरदाळा, 52-पालडोंगरी एकूण 8 केंद्र. 65-गोंदिया विधानसभा- 50-सोनपूरी, 78-चारगाव, 94-रतनारा, 115-कामठा, 116-कामठा, 117-कामठा, 123-लांबटोला, 169-गोंदिया, 176A-गोंदिया, 194-गोंदिया, 200-गोंदिया, 206-गोंदिया, 218-गोंदिया, 225-गोंदिया, 233-गोंदिया,240-गोंदिया, 250-गोंदिया, 253-गोंदिया, 271-गोंदिया, 276-गोंदिया, 303 A- फुलचुर एकूण 21 केंद्र असे एकूण 49 मतदान केंद्रावर फेरमतदान होणार आहे.
जिल्हाधिका-यांची तडकाफडकी बदली
दरम्यान निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांना निवडणुकीच्या कामातून बाजूला करण्यात आलं आहे.
त्यांच्याठिकाणी नागपूरच्या जिल्हा परिषद सीईओ कादंबरी भगत-बलकवडे यांची जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ईव्हिएमचा घोळ त्यामुळे गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांना भोवल्याचं बोललं जात आहे.
COMMENTS