गोपीचंद पडळकर बंडखोरीच्या तयारीत, 3 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार !

गोपीचंद पडळकर बंडखोरीच्या तयारीत, 3 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार !

सांगली – भाजपचे नाराज आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर हे बंडखोरी करणार असून येत्या 3 एप्रिल रोजी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. पडळकर यांनी पुन्हा एकदा निवडणूक काय असते ती संजय काका आणि विशाल दादाला कळेल असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. त्यामुळे सांगलीमध्ये लोकसभा विवडणुकीत वातावरण तापणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान सांगली लोकसभा मतदातसंघातून काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी आघाडीच्यावतीने विशाल पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.तर या मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार संजय पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या दोन्ही नेत्यांच्या विरोधात आता गोपीचंद पडळकर यांनी दंड थोपटले आहेत. त्यामुळे याठिकाणी तिरंगी निवडणूक होणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS