लोकनेत्याच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी

लोकनेत्याच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी

बीड: लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची आज 68 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त परळीतील गोपीनाथगडावर असंख्य कार्यकर्ते गर्दी करत आहेत. आपल्या लाडक्या नेत्याच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून अनेक कार्यकर्ते सकाळपासून त्याठिकाणी येत असल्याचं पहावयास मिळत आहे.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात झालेल्या दुर्घटनेमुळे गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मात्र तरीही त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे यावेळी परिवारासह गडावर उपस्थित राहणार आहेत.

 

COMMENTS