गोरेगावमधून सुभाष देसाईंविरोधात आघाडीकडून ‘या’ नेत्याला उमेदवारी?

गोरेगावमधून सुभाष देसाईंविरोधात आघाडीकडून ‘या’ नेत्याला उमेदवारी?

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. प्रत्येक मतदारसंघात तगडा उमेदवार देण्यासाठी या पक्षांकडून चाचपणी सुरु आहे. अनेक नेते पक्ष सोडून गेल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीपुढे उमेदवार निवडीचं मोठ आव्हान उभं ठाकलं असल्याचं दिसत आहे. मुंबईतील गोरेगाव विधानसभा मतदारसंघात आघाडीकडे तगडा उमेदवार नसल्यामुळे आघाडीकडून शिक्षक भारतीचे नेते, आमदार कपिल पाटील यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपचे मंत्री सुभाष देसाईंसोबत त्यांचा सामना रंगणार असल्याचं दिसत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना – भाजपची युती झाली तर या मतदारसंघातून युतीकडुन सुभाष देसाई यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. परंतु युती झाली नाही तर शिवसेनेकडून विद्या ठाकूर तर भाजवकडून सुभाष देसाई यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. युतीचं अजून निश्चित नसलं तरी गोरेगाव मतदारसंघातून आघाडीकडून कपिल पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा आहे.

दरम्यान पुर्वी गोरेगाव या मतदारसंघाची समाजवादीचा मतदारसंघ म्हणून ओळख होती. या मतदारसंघात सुरुवातीला समाजवादी पार्टीचे नेते शरद यादव यांनी निवडणूक लढवली होती. त्यानंतर समाजवादीच्या दिवंगत नेत्या आणि माजी खासदार मृणाल गोरे या देखील येथून निवडून आल्या होत्या. परंतु आता या मतदारसंघात समाजवादीचं वर्चस्व कायम राहिलं नाही. त्यामुळे या मतदारसंघातुन शिक्षकभारतीचे आमदार कपिल पाटील यांना मैदानात उतरवलं जाणार असलयाचं दिसत आहे.

COMMENTS