मुंबई – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राज्यपालांनी अमित देशमुख यांचं कौतुक केलं आहे. देशमुख यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा रद्द न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १५ जुलैनंतर या परीक्षा होणार आहेत. या परीक्षांचा नियोजित आराखडा घेऊन गुरुवारी
देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेतली. यानंतर राजभवनाकडून एक पत्रक जाहीर करण्यात आले आहे. यात राज्यपालांनी कोरोनाच्या संकटकाळात परीक्षांचे नियोजन करणाऱ्या अमित देशमुख यांचे कौतुक केले आहे.
दरम्यान राज्यपाल व राज्य सरकारमध्ये सध्या पदवीच्या अंतिम परीक्षा घेण्यावरून वाद सुरु आहे. विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षा झाल्याच पाहिजेत, असा राज्यपालांचा आग्रह आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मागच्या सत्रातील गुणांचे मूल्यांकन करुन सरासरी गुणवाटप करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा घेण्याची तयारी दाखविली आहे.
COMMENTS