भाजपच्या मंत्रीमंडळ शपथविधीचा महूर्त ठरला, ‘या’ दिवशी होणार शपथविधी सोहळा?

भाजपच्या मंत्रीमंडळ शपथविधीचा महूर्त ठरला, ‘या’ दिवशी होणार शपथविधी सोहळा?

मुंबई – राज्यात सत्ता कोण स्थापन करणार याबाबत गेली काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. परंतु आता ही चर्चा लवकरच थांबणार असल्याचं दिसत आहे. कारण भाजपच्या मंत्रिमंडळ शपथविधीचा मुहूर्त ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंगळवारी 5 ऑक्टोबर रोजी वानखेडे स्टेडियमवर भाजपा मंत्रीमंडळाचा शपथविधी समारंभ होणार असल्याची माहिती आहे. याबाबतची माहिती शासनातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. शिवसेनासोबत आली तर त्यांच्याबरोबर अन्यथा भाजपाचा एकट्याचा शपथविधी करण्याच्या हालचाली सुरु असल्याचीही माहिती आहे.

दरम्यान आमदार प्रसाद लाड आणि चंद्रकांत देसाई यांच्याकडे तयारीची जबाबदारी देण्यात आली असून 2014 प्रमाणेच सत्तास्थापन करण्याची भाजपाची तयारी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या 5 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी शपथविधी समारंभ आयोजित करण्याचे निश्चित केले आहे. हा शपथविधी समारंभही भव्य दिव्य करण्याची तयारी सुरु असून 2014 साली मुख्यमंत्र्यांसह भाजपाच्या प्रमुख 10 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला होता. शिवसेना त्यानंतर दीड महिन्यांनी सरकारमध्ये सहभागी झाली होती. यावेळी शिवसेना आता बरोबर आली तर ठीक अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या काही प्रमुख मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.

COMMENTS