मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत धनगर समाजासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या अखत्यारीतील एसटी समाजाला असणाऱ्या सर्व सवलती धनगर समाजाला लागू करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे एसटी समाजाच्या 22 योजना धनगर समाजाला लागू होणार आहेत. पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास (पदुम) मंत्री महादेव जानकर यांनी बैठकीनंतर याची माहिती दिली.
सरकारच्या या निर्णयामुळे शिष्यवृत्तीसह शैक्षणिक योजना, भूमिहीनांना जमिनी तसंच घरकुल योजनांचा लाभ धमगर समाजाला मिळणार आहे. त्यामुळे आरक्षणाच्या प्रतिक्षेत असलेल्या धनगर समाजाला मोठा दिलासा मिळणार असल्याच दिसत आहे.2014 च्या विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याची शिफारस करु, असं आश्वासन भाजपने दिलं होतं. मात्र पाच वर्षांत हे आश्वासन पूर्ण करण्यात अपयश आल्याने, अखेर निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाला खुश करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
COMMENTS