“सरकारी धोरणांचे कौतुक करणा-या चित्रपटांनाच आता परवानगी मिळणार”

“सरकारी धोरणांचे कौतुक करणा-या चित्रपटांनाच आता परवानगी मिळणार”

नवी दिल्ली – काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय याच्या ‘मर्सल’ चित्रपटातील दृश्यांवर भाजपने आक्षेप घेतल्याच्या पार्श्वभूमीवर निशाणा साधला असून सरकार धार्जिण्या चित्रपटांनाच आता फक्त परवानगी दिली जाईल, असा टोला चिदंबरम यांनी लगावला आहे.

शनिवारी ट्विटरवरुन मोदी सरकारवर पी. चिदंबरम यांनी निशाणा साधला. चिदंबरम म्हणाले आहेत की, यापुढे फक्त सरकारी धोरणांचे कौतुक करणाऱ्या चित्रपटांनाच परवानगी दिली जाईल. दरम्यान भाजपने ‘मर्सल’ चित्रपटातील दोन दृश्ये वगळण्याची मागणी केली आहे. आज जर ‘परासक्ती’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असता तर काय झाले असते असा प्रश्नही त्यांनी ट्विटरद्वारे उपस्थित केला. 1952 मध्ये ‘परासक्ती’ हा तामिळ चित्रपट प्रदर्शित झाला होता. हिंदू धर्मावर या चित्रपटाद्वारे भाष्य करण्यात आले होते. यामुळे चित्रपटावर टीकाही झाली होती. अभिनेता विजयचा ‘मर्सल’ या चित्रपटातील दृश्यांमुळे जीएसटी आणि डिजिटल इंडियाविषयी गैरसमज निर्माण होऊ शकतात आणि ती त्यामुळे दृश्ये वगळण्यात यावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष टीएन सौंदरराजन यांनी केली होती.

 

 

COMMENTS