मुंबई – विधान परिषदेसाठी महाविकास आघाडी सरकारकडून पाठवण्यात आलेल्या 12 नावांपैकी काही नावं वगळण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये एकनाथ खडसे आणि राजू शेट्टी यांच्या नावाचा समावेश असण्याची शक्यता आहे. 7 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्यपालांकडून ही यादी मंजूर होण्याची शक्यता आहे.परंतु यात तांत्रिक मुद्दे उपस्थितीत केले जाण्याची शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त सदस्यासाठी कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा व सहकार क्षेत्रात योगदान दिलेल्या व्यक्तीची शिफारस करण्यात येत असते. एकनाथ खडसे यांची शिफारस ही सहकार क्षेत्रातून करण्यात आली आहे. त्यामुळे खडसेंच्या नावावर आक्षेप ठेवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी महाविकास आघाडीकडून 12 नावे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठवली आहेत. ती यादी खालीलप्रमाणे आहे.
शिवसेना उमेदवार
१)उर्मिला मातोंडकर
२) नितीन बानगुडे पाटील
३) विजय करंजकर
४) चंद्रकांत रघुवंशी
राष्ट्रवादी काँग्रेसकडून
१) एकनाथ खडसे
२) राजू शेट्टी
३) यशपाल भिंगे – साहित्य
४) आनंद शिंदे – कला
काँग्रेसकडून
१) सचिन सावंत
२) रजनी पाटील
३) मुजफ्फर हुसैन
४) अनिरुद्ध वणगे – कला
COMMENTS