सत्तास्थापन करण्यासाठी राज्यपालांकडून भाजपला निमंत्रण !

सत्तास्थापन करण्यासाठी राज्यपालांकडून भाजपला निमंत्रण !

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मोठा निर्णय घेतला असून काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तास्थापनेचे आमंत्रण दिल्याची माहिती आहे. यामुळे आता विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेला भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. यानंतर भाजप सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यामुळे भाजप आपलं बहूमत सिध्द करणार का हे पाहण गरजेचं आहे.

दरम्यान शिवसेना-भाजपमधील संघर्षामुळे अजूनही राज्यात सरकार स्थापन झालं नाही. त्यामुळे राज्यात आता सरकार कोण स्थापन करणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आमच्याकडे दुसरे पर्याय खुले असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे.

परंतु राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेला अद्याप कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसत आहे. शरद पवार यांनी प्रभावी विरोधी पक्ष हीच आमची जबाबदारी असल्याचा आज पुनरुच्चार केला. शिवसेनेबरोबर जाण्याचा कुठलाही विचार अजून झालेला नाही, असंही पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला नाही तर शिवसेनेची भूमिका काय? असणार याबाबतही तर्कवितर्क लावले जात आहेत.

COMMENTS