मुंबई – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली आहे. महाराष्ट्राचं राज्य सरकार घटनेतील तरतुदीनुसार बनू शकत नाही, याची खात्री पटल्यानंतर राज्यपालांनी घटनेच्या कलम 356 नुसार प्राप्त अधिकाराअंतर्गत राष्ट्रपतींकडे त्याबाबतचा अहवाल पाठवला असल्याचं राज्यपालांनी पत्रकात म्हटलं आहे. राजभवनाकडून राष्ट्रपती राजवटीच्या शिफारशीचं पत्रक ट्विट करण्यात आलं आहे.
Raj Bhavan Press Release 12.11.2019 3.16 PM pic.twitter.com/qmlQA6ghBR
— Governor of Maharashtra (@maha_governor) November 12, 2019
दरम्यान सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने वेळ वाढवून मागितली होती. परंतु मुदतीत सत्ता स्थापनेचा दावा करण्यास राष्ट्रवादी असमर्थ असल्याचा निष्कर्ष काढत राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली आहे.राज्यपालांनी दुपारी दीडच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंब्यांचं पत्रे आहेत की नाही याबाबत विचारणा केली. मात्र आमच्याकडे बहुमताचा आकडा नसल्याचं राष्ट्रवादीने राज्यपालांना सांगितलं. त्यानंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवटीच्या शिफारशीसंदर्भातील अहवाल राष्ट्रपतींना पाठवला आहे.
COMMENTS