मराठा आरक्षणाच्या विधेयकावर राज्यपालांनी केली स्वाक्षरी !

मराठा आरक्षणाच्या विधेयकावर राज्यपालांनी केली स्वाक्षरी !

मुंबई – मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपालांनी आज स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आता मराठा बांधवांच्या आरक्षणाचा कायदा अस्तित्त्वात आला आहे. याबाबतचे विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेत कोणत्याही चर्चेविना मंजूर झाले. मराठा समजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही सभागृहात या विधेयकाला पाठिंबा देण्यात आला आहे. त्यानंतर हे विधेयक राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आले होते. आज अखेर आज राज्यपाल सी विद्यासागरराव यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केली आहे.

दरम्यान मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय झाल्यानंतर ते कोर्टात टिकेल की नाही? याची चर्चा सुरु झाली. कोर्टात आरक्षण टिकवणं ही सरकारची जबाबदारी आहे अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली. तर कोर्टात आरक्षण टिकावं म्हणून वकिलांची फौज उभी करू असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हटले आहे.आज राज्यपालांची सही झाल्याने मराठा आरक्षण विधेयकाचा कायदा अस्तित्त्वात आला आहे.तसेच मराठा आरक्षण विधेयकाला एकमताने पाठिंबा दिल्याने मुख्यमंत्र्यांनी काल विरोधकांचेही आभार मानले होते.

 

COMMENTS