विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू

मुंबई – महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे, मराठवाडा, नागपूर या तीन पदवीधर आणि पुणे व अमरावती या दोन शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान सुरू झाले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस यांची महाविकास आघाडी विरुध्द भाजप अशी ही निवडणूक होत असल्याने याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकारला एक वर्षपूर्ण होत असताना विधानपरिषदेची निवडणूक होत आहे. महाविकास आघाडीकडून पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी पाच उमेदवारन निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन तर शिवसेनेचा एक उमेदवार रिंगणात आहेत. तर भाजपनेही महाविकास आघाडीविरोधात उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. दरम्यान निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये बंडखोरी पाहायला मिळाली. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात उमेदवारी न दिल्याने रमेश पोकळे यांनी बंडखोरी केली आहे. या निवडणुकीत मनसे, वंचित बहुजन आघाडी आणि बंडखोरांनीर महाविकास आघाडी आणि भाजपच्या उमेदवारांसमोर आव्हान उभे केले आहेत
या निवडणुकीमध्ये अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे विरुध्द भाजपचे डॉ. नितीन धांडे, पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे अरुण लाड विरुध्द भाजपचे संग्राम देशमुख,पुणे शिक्षक मतदारसंघात काॅंग्रेसचे प्रा. जयंत आसगांवकर विरुध्द भाजपचे जितेंद्र पवार, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण विरुध्द भाजपचे शिरीष बोराळकर, नागपूर पदवीधर मतदारसंघात काॅंग्रेस अभिजीत वंजारी विरुध्द भाजपचे संदीप जोशी अशी लढत होत आहे

COMMENTS