अण्णा हजारेंच्या गावात मतदारांना साड्या वाटपाचा प्रकार, गुन्हा दाखल

अण्णा हजारेंच्या गावात मतदारांना साड्या वाटपाचा प्रकार, गुन्हा दाखल

अहमदनगर – देशात आदर्श गाव म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिध्दीकडे पाहिले जाते. या गावात अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीची बिनविरोध निवडणुकीची परंपरा होती. पण यंदा अनेक दशकांनंतर निवडणूक होत असून ही निवडणूक गावाच्या आणि राज्याच्या दृष्टीने लक्षवेधी ठरली. यावेळी निवडणूकीत अण्णांनी घालून दिलेल्या आदर्शांसोबत निवडणुक आयोगाच्या आचारसंहितेचा भंग केला गेला.

ग्रामपंचायतीची बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडित झाल्यानंतर अण्णा हजारे यांनी काही दिवसांपूर्वी प्रतिक्रिया व्यक्त केले होते की, तरुणांच्या आग्रहाखातर ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. ही निवडणूक होत असताना शांततेच्या मार्गाने आणि निकोप लोकशाहीच्या मार्गाने व्हावी, अशी अशाही व्यक्त केली होती. मात्र, आज मतदानाच्या दिवशी गावात मतदारांना भुलवण्यासाठी उमेदवारांकडून चक्क साड्यांचे वाटप करण्यात आले.

याप्रकरणी पोलिसांनी सुरेश दगडू पठारे व किसन मारूती पठारे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून 10 लाख रुपयांची इनोव्हा कार आणि 27 हजार 200 रुपयांच्या 136 साड्या जप्त. केल्या आहेत. पारनेर पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

COMMENTS