अहमदाबाद – सरकारविरोधातील अँन्टीइन्कम्बन्सी आणि बदललेली जातीय समिकरणे यामध्ये भाजप तब्बल 46 आमदारांची तिकीटे कापण्याच्या विचारात आहे. भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. एका हिंदी दैनिकाने हे वृत्त दिले आहे.
गुजरातमध्ये भाजप सत्तेवर आल्यापासून हिंदू मुस्लिम असेच साधारणपणे मतांचे ध्रुवीकरण व्हायचे. आता मात्र परिस्थिती बदलेली आहे. पाटीदार भाजपवर नाराज आहेत. दलितांची वेगळी मागणी आहे. तर ओबीसीही एकवटला आहे. त्यामुळे अनेक मतदारसंघात जातीनिहाय अभ्यास करुन तिकीट वाटप केलं जाणार असल्याची माहितीही भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने दिले आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी प्रत्येक जिल्ह्यातील भाजप पदाधिका-यांशी चर्चा करुन तिकीट कापणा-या आमदारांची लिस्ट केली आहे. या लिस्टवर या किंवा पुढच्या आठवड्यात चर्चा करुन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
COMMENTS