नवी दिल्ली – गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेले आहे. ही निवडणुक भाजप आणि कॉंग्रेससाठी महत्वपूर्ण असणार आहे. गुजरातमध्ये वडोदरा येथे भाजप आणि कॉंग्रेसकडून लोकांना पैसे वाटतानाचे फोटे आता समोर आले आहे.
निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला असून मतदारांना आकर्षित करून मते पदरी पाडून घेण्यासाठी उमेदवारांकडून विविध घोषणा केल्या जात असताना, रविवारी एक कार्यक्रम दरम्यान भाजप आणि कॉंग्रेसच्या दोन नगरसेवकांनी लोकांना पैसे वाटप केले आहे. असं वृत्त एएनआय या वृत्त संस्थेने दिले आहे.
वडोदरा येथे रविवारी काँग्रेसच्या नगरसेवकांकडून 50 रुपयांच्या नोटा वाटण्यात आल्या त्या सोबतच नारळ ही देण्यात येत होता. काँग्रेस चिराग जावेरी यांनी ज्या मुलांना हे पैसे वाटले ते एकाच गणवेशात खुर्चीत बसलेले होते.
तसेच भाजपचे नगरसेवक कल्पेश पटेल यांनी एका पाकीटातून या पैश्याचे वाटप केले. दरम्यान या पैश्याचे वाटप हे मतदाराला आकर्षित करण्यासाठी होता की, धार्मिक कार्यक्रमाचा एक भाग होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र सोशल मिडीयात हे फोटो खुप व्हायरल होत आहेत.
Gujarat: Congress Corporator Chirag Zaveri and BJP Corporator Kalpesh Patel were seen distributing money to people in #Vadodara, yesterday. pic.twitter.com/4UBRftvIK9
— ANI (@ANI) October 30, 2017
COMMENTS