नवी दिल्ली – गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. नवसर्जन यात्रा द्वारे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मॅरेथॉन दौरा करुन पक्षाला नव संजीवनी मिळू शकते. एवढेच नाही तर, काँग्रेसने भाजपच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवण्यासाठी जातीय समीकरण डोळ्यांसमोर ठेवून राज्यात युवा त्रिमूर्तींची मोट बांधली आहे. गुजरातमध्ये भाजपनेही राहुल गांधींनी मात देण्यासाठी संपूर्ण तयारी केली आहे. भाजपने सत्ता टिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 50 रॅली आयोजित केल्या असून देशभरातील 200 ओबीसी आणि दलित नेत्यांना रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे.
काँग्रेसने विजयासाठी ओबीसी नेता अल्पेश ठाकोर यांना सोबत घेतले असून दलित युवा नेता जिग्नेश मेवाणी याचं समर्थन घेतले आहे, त्याबरोबर पाटीदार नेता हार्दिक पटेल यांच्या द्वारे भाजपचे पारंपरिक मतामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जाईल. भाजपनेही मिशन गुजरातसाठी आपले ब्रह्मअस्त्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहाय्याने भाजपने जवळपास 50 सभांची तयारी करणार आहे. नोव्हेंबर अखेर या रॅलीची सुरूवात होईल त्याच सोबत शहरी भागात नरेंद्र मोदींचा रोड शो होणार आहे.
गुजरातच्या सर्व जिल्ह्यांमध्ये भाजप किमान दोन तरी रॅलीचे नियोजन पंतप्रधान मोदी यांच्यासाठी करणार आहेत. राज्यात 33 जिल्हे आणि 182 विधानसभा जागा आहेत. मोदींची जवळपास 50 रॅलीचे नियोजन आहे. अशा प्रकारे मोदींच्या सभा द्वारे तीन ते चार विधानसभा जागांवर लक्ष्य केंद्रित केले जाणार आहे.
गुजरात विधानसभा निवडणुका दोन टप्प्यांत आहेत. पहिला टप्पा 9 डिसेंबरला आहे आणि दुसरा 14 डिसेंबरला आहे. पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी 24 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. पहिल्या टप्प्याच्या मतदानाच्या क्षेत्रात पंतप्रधानांच्या रॅलीचे नियोजनाची तयारी केली जात आहे.
कॉंग्रेसच्या त्रिमूर्तीला मात देण्यासाठी भाजपाने उत्तर प्रदेश आणि बिहारमधील 200 ओबीसी आणि दलित नेत्यांना गुजरातमध्ये प्रचार करण्यासाठी आणण्याचे ठरविले आहे. हे नेते ओबीसी आणि दलित भागात घरोघरी जाऊन मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रतरत्न करताना दिसतील. गुजरातमध्ये ओबीसी मतदार 52 टक्के आहेत, याचा राज्यातील 80 ते 85 विधानसभा जागांवर परिणाम होत.
गुजरातमध्ये 7 टक्के दलित मतदार आहेत. ऊनामध्ये घडलेल्या घटनेनंतर दलित मतदार भाजपावर नाराज असल्याचं बोललं जातंय. ऊना आंदोलनाने ओळखले जाणारे दलित नेता जिग्नेश मेवाणी यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. अशा परिस्थितीत भाजपानेही दलित नेत्यांना गुजरात निवडणुकीत उतरविण्याच्या तयारीत आहे. यात दलित चेह-यामध्ये केंद्रीय मंत्री राम विलास पासवान आणि आत्माराम परमार यांना उतरविले जाणार आहे.
COMMENTS