गुजरात निवडणुकीनंतरच संसदेचे हिवाळी अधिवेशन !

गुजरात निवडणुकीनंतरच संसदेचे हिवाळी अधिवेशन !

नवी दिल्ली – गुजरात निवडणुकीचे दोन्ही टप्पे संपल्यानंतर संसदेच्या हिवाळी अधिवेशानाला सुरुवात होणार आहे.  15 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान संसदेचं हिवाळी अधिवेशन होणार आहे..

ख्रिसमस निमित्ताने 25 आणि 26 डिसेंबर रोजी अधिवेशनाला सुट्टी असणार आहे, अशी माहिती संसदीय कामकाज समितीने दिली आहे. अधिवेशन सुरळीत चालू देण्यासाठी विरोधकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे.

अधिवेशनाला उशीर होत असल्यामुळे काँग्रेसने चिंता व्यक्त केली होती. तसेच, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे तक्रारही केली होती. राष्ट्रपतींना देण्यात आलेल्या पत्रात काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली होती. मात्र, या पत्राला भाजपचे नेते संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी प्रत्युत्तर दिले. आघाडी सरकारच्या काळात 2008 आणि 2013 मध्ये हिवाळी अधिवेशन चक्क डिसेंबरमध्ये घेण्यात आले होते, असा दाखला दिला.

 

 

COMMENTS