गुजरातच्या प्रचारात मनमोहन सिंग !

गुजरातच्या प्रचारात मनमोहन सिंग !

नवी दिल्ली – गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळते आहे. देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग काँग्रेसचा प्रचार करणार आहेत. तर भाजपने प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासह पक्षाचे बडे नेते मैदानात उतरवले आहेत. 

मनमोहन सिंग काँग्रेसचा प्रचार करणार असून, गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील काँग्रेसच्या प्रचारात नोटाबंदी आणि जीएसटीचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवण्यात आलेला आहे. यावरून काँग्रेसला सरकारविरोधी वातावरणनिर्मिती करण्यात काही प्रमाणात यशही मिळाले आहे. मनमोहन सिंग  गुजरातमध्ये एका दिवसासाठी प्रचार करणार आहेत. मनमोहन सिंग हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ असल्याने त्यांनी जीएसटी आणि नोटाबंदीवरून केलेल्या टीकेचा परिणाम अधिक होऊ शकतो. नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाचा विकासदर दोन टक्क्यांनी घसरेल, हे मनमोहन सिंग यांचे भाकीत खरे ठरले होते. दरम्यान मंगळवारी गुजरातमध्ये प्रचाराला आल्यावर मनमोहन सिंग हे अहमदाबाद येथील काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषदही घेणार आहेत.

 

COMMENTS