अहमदाबाद – गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराला सुरूवात झाली आहे. भाजप आणि काँग्रेसने सेलिब्रिटींना प्रचाराच्या मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. बॉलिवूडसह टीव्हीवरील काही अभिनेते प्रचार करताना दिसून येणार आहेत.
सलमान खान, अक्षय कुमार आणि अजय देवगणसह 20 पेक्षा अधिक कलाकार भाजपासाठी प्रचार करणार आहेत. तर महिमा चौधरी, अमिषा पटेल, रितेश देशमुख, नगमा आणि राज बब्बर काँग्रेसच्या प्रचारात दिसणार आहेत. काँग्रेसच्या प्रचारात मात्र सेलिब्रिटींची संख्या कमी आहे. महिमा चौधरी, नगमा, रितेश देशमुख, असरानी, राज बब्बर आणि नवज्योतसिंग सिध्दू निवडणुकीत प्रचार करताना दिसतील.
भाजप प्रचारामध्ये सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगण, विवेक ओबेरॉय, जॅकी आणि टायगर श्रॉफ, शिल्पा- शमिता शेट्टी, बिपाशा बासू आणि प्रिती झिंटा अशा सेलिब्रिटींना उतरवणार आहे. तसेच खासदार हेमा मालिनी आणि मनोज तिवारीही प्रचारात असणारच आहेत. त्याशिवाय कॉमेडीयन कपिल शर्मा आणि परेश रावल एकत्रितपणे प्रचारात उतरण्याची शक्यता आहे. नरेश कानोडिया, हितू कानोडिया, रोमा माणेक, ओसमाण मीर, अरविंद वेगडा आणि तारक मेहता का उल्टा चश्मामधील कलाकार भाजपचा प्रचार करताना दिसणार आहे. क्रिकेटर युसूफ पठाण आणि इरफान पठाणही पक्षाचा प्रचार करतील. त्याशिवाय सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, देवआनंदचा डुप्लिकेट हेही प्रचारात उतरणार आहेत.
COMMENTS