गुजरातमध्ये काँग्रेस आणि भाजपचे ‘हे’ आहेत मुख्यमंत्रीपदाचे दावेदार!

गुजरातमध्ये काँग्रेस आणि भाजपचे ‘हे’ आहेत मुख्यमंत्रीपदाचे दावेदार!

गुजरात – गुजरात विधानसभेचा निकाल काही तासांवर येवून ठेपला आहे. त्यामुळे गुजरातमध्ये सत्ता कोणाची येणार हे 18 डिसेंबरला कळणार आहे. परंतु सत्ता कोणाची येणार हे जरी गुलदस्त्यात असलं तरी भाजप आणि काँग्रेसमधील काही तगड्या उमेदवारांची नावं मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार चर्चेत आहेत. या दोन्ही पक्षांमधील मुख्यमंत्रीपदाचे दावेदारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार

भारतसिन सोलंकी

भारतसिन सोलंकी हे गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख असून त्यांचे वडील माधविन सोलंकी गुजरातमधील मुख्यमंत्री होते.

सिद्धार्थ पटेल

सिद्धार्थ पटेल हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून  गुजरातमधील पाटिदार समाजाचं ते नेतृत्व करतात.

अर्जुन मोधवाडीया

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून आक्रमक विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच ते 2004-2007 विधानसाभा सदस्य म्हणून निवडून आले होते.

शक्तिसिंह गोहील

शक्तिसिंह गोहिल हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून विधानसभेत ते चार वेळा निवडून आले आहेत. सौराष्ट्रात काँग्रेस पक्षाची मजबूत बांधणी त्यांनी केली आहे.तसेच ते मागील राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभे होते.

परेश धनानी

परेश धनानी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून पटेल समाजाचा नेता म्हणूनही त्यांची दुसरी ओळख आहे.

भाजपचे गुजरातमधील मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

विजय रुपाणी

आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर विजय रुपाणी यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली होती. अनेकांनी रुपाणींच्या कार्याला पसंती दिली आहे.

नितीनभाई पटेल

गुजरातच्या राजकारणात नितीनभाई पटेल अतिशय महत्त्वाची व्यक्ती असून त्यांनी आतापर्यंत आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, कुटूंब कल्याण, रस्ते आणि इमारत, या खात्यांची मंत्री म्हणून धुरा सांभाळली आहे. त्यांनाही जनतेने कौल दिला आहे.

अमित शाह

अमित शाह यांचंही मुख्यमंत्रीपदासाठी नाव चर्चेत आहे. परंतु त्यांच्याकडे सध्या पक्षाची जबाबदार असल्यामुळे ते पुन्हा राज्यात येतील की नाही याबाबत पक्षच ठरवणार आहे.

COMMENTS