गुजरातमध्ये भाजप अडचणीत, एबीपी न्यूज, सीएसडीएसच्या सर्व्हेत काँग्रेस भाजपमध्ये काटें की टक्कर !

गुजरातमध्ये भाजप अडचणीत, एबीपी न्यूज, सीएसडीएसच्या सर्व्हेत काँग्रेस भाजपमध्ये काटें की टक्कर !

गुजरातमध्ये काँग्रेसने कितीही रान पेटवले असले तरी भाजपचं काठावर का होईना सत्ता मिळवेल असा अनेकांचा अंदाज होता. काही दिवासांपूर्वी झालेल्या ओपीनियन पोल सर्व्हेमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. आज एपीबी आणि सीएसडीएस यांनी केलेल्या सर्व्हेमध्ये मात्र गुजारतमध्ये भाजप अडचणीत आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. दोन्ही पक्षात काटें की टक्कर निर्माण झाली आहे.

या सर्व्हे मध्ये भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी 43 टक्के मते मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. इतरांना 14 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. तर जागांचा विचार केला तर भाजपला 95 जागा म्हणज्ये अगदीच काठावरचं बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसही फारशी मागे नाही. काँग्रेसला 82 जागा मिळतील असा अंदाज आहे. इतरांना 5 जागा मिळण्याची शक्यता आहे. आता मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात योग्य नियोजन कोण करतं यावरच बरच काही अवलंबून आहे. मात्र गुजरातचं वातावरण बदलत आहे. हे मात्र नक्की

COMMENTS