मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘या’ मुख्यमंत्र्याचं फिटनेश चॅलेंज !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘या’ मुख्यमंत्र्याचं फिटनेश चॅलेंज !

मुंबई   गेल्या काही दिवसांपासून देशात फिटनेश चॅलेंजची मोहीम सुरु असल्याचं दिसून येत आहे. केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी ही मोहीम सुरु केली आहे. त्यांच्या या मोहीमेनंतर एकमेकांना चॅलेंज करत अनेक जण आपला व्यायाम करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अशातच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही एका मुख्यमंत्र्यानं फिटनेस चॅलेंज केलं आहे.  गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी फडणवीसांना फिटनेस चॅलेंज दिलं आहे. व्यायाम करतानाचा व्हिडीओ ट्विट करत रुपानींनी हे आव्हान दिलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रुपाणींचं हे आव्हान स्वीकारुन मुख्यमंत्र्यांना आपला व्यायाम करत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करुन आणखी एका व्यक्तीला फिटनेस चॅलेंज द्यावं लागणार आहे.

दरम्यान राज्यवर्धन सिंह राठोड यांनी देशात फिटनेसला प्रोत्साहन देण्यासाठी सोशल मीडियाचा अनोख्या पद्धतीने आधार घेतला होता. राठोड यांनी व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर करुन अभिनेता हृतिक रोशन, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल यांना आव्हान दिलं होतं. विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सहकारी महेंद्रसिंह धोनीला नॉमिनेट केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोंदींनीही विराटचं आव्हान स्वीकारलं असून लवकरच व्यायामाचा व्हिडीओ पोस्ट करणार असल्याचं ट्वीट त्यांनी केलं आहे. त्यानंतर आता देशभरात फिटनेश मोहीम सुरु झाली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS