गुजरात विधानसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, काय आहेत वैशिष्ट्य, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कोण दिला उमेदवार ?

गुजरात विधानसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, काय आहेत वैशिष्ट्य, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कोण दिला उमेदवार ?

अहमदाबाद – गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं अखेर 77 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये तब्बल 20 पाटीदारांना स्थान मिळालं आहे. या यादीमध्ये हार्दिक पटेल यांच्या सहका-यांनाही तिकीटे देण्यात आली आहेत.

पहिल्या यादीची वैशिष्ट्य

  • 70 पैकी 20 उमेदवार पाटीदार समाजाचे
  • मुख्यमंत्रीपदाचे दावेदार समजले जाणारे शक्तीसिंह गोहिल यांना मांडवी विधानसभा मतदारसंघातून तिकीट
  • मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्याविरोधात इंद्रनिल राजगुरू यांना तिकीट देण्यात आलंय. तिथे चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.
  • काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोढवाढिया यांना पोरबंदरमधून तिकीट देण्यात आलं आहे.

या यादीमध्ये हार्दिक पटेल यांच्या काही समर्थकांना तिकीटे दिली आहेत. त्यामुळे हार्दिक पटेल हे काँग्रेससोबत जाण्याचं जवळपास निश्चित झालंय. काल झालेल्या बैठकीत हार्दिक यांच्यासोबत बोलणी यशस्वी झाल्याचा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. हार्दिक पटेल हे उद्या याबाबत आपली भूमिका जाहीर करणार आहेत.

COMMENTS