गुजरातमधील निवडणूक पुढे ढकला, सर्वपक्षीय मागणीमुळे निवडणूक आयोगापुढे नवा पेच !

गुजरातमधील निवडणूक पुढे ढकला, सर्वपक्षीय मागणीमुळे निवडणूक आयोगापुढे नवा पेच !

अहमदाबाद – गुजरातमध्ये निवडणूकीचा प्रचार एवढ्या शिगेला पोहचला असताना आता निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी मध्येच कशी आली असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. प्रचार जोरात सुरू असला तरी काँग्रेस आणि भाजपसह इतर अनेक पक्षांना वेगळीच धास्ती लागली आहे. ती म्हणज्ये निवडणुकीच्या काळातच असलेले लग्नाचे मुहूर्त. निवडणुकीच्या काळातच गुजरातध्ये जवळपास 25 हजार लग्न आहेत. त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम मतदानावर होईल अशी भिती राजकीय पक्षांना लागली आहे. त्यामुळेच त्यांनी मतदानाची तारीख पुढे ढलण्याची मागणी केली आहे.

गुजरातमध्ये 9 आणि 14 डिसेंबर असं दोन टप्प्यात मतदान होणार आहे. याकाळात राज्यात जवळपास 25 हजार लग्न होणार आहेत.  त्यामुळे त्याचा परिणाम मतदान कमी होण्यात होईल अशी भिती राजकीय पक्षांना लागली आहे. 23 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या काळात सर्वाधिक लग्न नियोजित आहेत. लग्नाचा विधी कुठेतरी बाहेर जाऊन करण्याचा मोठा ट्रेंड सध्या गुजरातमध्ये आहे. अनेकजण 4 ते 5 दिवस कुठेतरी परराज्यात जाऊन लग्नाचे विधी उरकतात. गोवा, जयपूर, उदयपूर अशा ठिकाणी या काळात मोठ्या प्रमाणात बुकिंग झालं आहे. त्याचा फटका मतदानाला बसण्याची शक्यता आहे.

COMMENTS