गुजरात विधानसभेत राडा, काँग्रेस आमदारानं भाजप आमदाराला पट्ट्यानं मारलं !

गुजरात विधानसभेत राडा, काँग्रेस आमदारानं भाजप आमदाराला पट्ट्यानं मारलं !

गुजरात – गुजरात विधानसभेमध्ये काँग्रेस आमदाराने आणि सत्ताधारी भाजप आमदारामध्ये राडा झाला असल्याचं पहावयास मिळालं आहे.काँग्रेसच्या आमदारानं भाजपच्या आमदाराला चक्क पट्ट्याने मारलं असल्याचं समोर आलं आहे. या दोन्ही आमदारांमध्ये विधानसभेतच राडा झाल्यामुळे देशभरात जोरदार चर्चा लंगली आहे. गुजरातमधील काँग्रेस आमदार प्रताप दुधात यांनी भाजप आमदार जगदीश पांचाळ यांना चक्क कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली आहे.

दरम्यान प्रताप दुधात हे काँग्रेसचे निकोल मतदारसंघाचे आमदार आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसचे आमदार विक्रम माडम यांनी सभागृहातील माईक तोडला आहे, तर राजुलाचे आमदार अंबरीश डेर यांनीही भाजप आमदाराला मारहाण केली असल्याची माहिती आहे. गुजरात विधानसभेत झालेल्या या राड्यामुळे सर्वत्र चर्चा रंगली असून काँग्रेस आणि भाजपमधला वादा आता चव्हाट्यावर आला असल्याचं दिसून येत आहे.

COMMENTS