नक्षलवाद्यांच्या धमक्यांना घाबरणार नाही – हंसराज अहिर

नक्षलवाद्यांच्या धमक्यांना घाबरणार नाही – हंसराज अहिर

नवी दिल्ली  नक्षलवाद्यांच्या धमक्यांना घाबरणार नाही, त्यांना चोख प्रत्युत्तर देणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धमकी दिल्यानंतर अहिर यांनी हे वक्तव्य केलं असून त्यांच्या सुरक्षेविषयी अधिक सतर्क राहण्याचे आदेश राज्याच्या गृह विभागानं सुरक्षा यंत्रणेला दिले आहेत.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदीही नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर होते. अशी माहिती सरकारी वकिल उज्वला पवार यांनी पुणे सत्र न्यायालयात दिली होती. माजी पंतप्रधान राजीव गांधींसारखाच घातपात कऱण्याचा नक्षलवाद्यांचा प्लॅन होता असं त्यांनी म्हटलं होतं. तसेच नक्षलवाद्यांनी एम 4 नावाचं शस्त्र आणि त्यासाठी 4 लाख राऊंड खरेदी करण्याची तयारी असल्याचा धक्कादायक माहिती पोलिसांनी मिळाली या घटनानंतर अहिर यांनी दखल घेतली असून नक्षलवाद्यांच्या धमक्यांना घाबरणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS