अहमदाबाद – पाटीदार समाजाचा नेता नेता हार्दिक पटेल याचा कथित सेक्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. हार्दिक पटेलच्या विरोधकांकडून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तर या व्हिडिओत दिसत असलेली व्यक्ती आपण नसून, मला बदमान केल्यास हरकत नाही, पण या व्हिडिओमधूम गुजरातमधील महिलांना बदनाम करण्यात येत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेल्या या व्हिडिओमध्ये हार्दिक पटेल सारखा दिसणार तरुण एका महिलेसोबत बंद खोलीत असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या तारखेवरून हा व्हिडिओ मे महिन्यात शूट करण्यात आलेला असण्याची शक्यता आहे. मात्र हार्दिकने या व्हिडिओत आपण असल्याचा आरोप हार्दिकने फेटाळला आहे. हार्दिकच्या विरोधकांकडून हा व्हिडीओ मोठ्याप्रमाणावर शेअर केला जात आहे.
दरम्यान, भाजपा माझी बनावट सेक्स सीडी जारी करुन मला बदनाम करण्याचा प्रयत्न करू शकते, असा आरोप हार्दिक पटेलने काही दिवसांपूर्वी केला होता. ”मला बदनाम करण्यासाठी भाजपानं माझी बनवाट सेक्स सीडी बनवली आहे. ही सीडी बरोबर निवडणुकीपूर्वी जारी करण्यात येईल. म्हणून प्रतीक्षा करा, पाहा आणि आनंद घ्या”. असे त्याने म्हटले होते.
अब गंदी राजनीति की शुरुआत हो गई हैं।मुझे बदनाम कर लो कोई फ़र्क़ नहीं पड़ेगा,लेकिन गुजरात की महिलाओ का अपमान किया जा रहा हैं।
— Hardik Patel (@HardikPatel_) November 13, 2017
COMMENTS