नवी दिल्ली – गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे माहिती आहे. याबाबत हार्दिक पटेलनं स्वतः उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील सभेत घोषणा केली आहे. यापूर्वीही हार्दिक पटेलनं आपण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं संकते दिले होते.
हार्दिक पटेलनं गुजरातमधील पाटीदार समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा घेऊन राज्यासह देशात रान पेटवले होते. या आंदोलनामुळे त्याला एक युवा नेता अशी ओळख मिळाली.हार्दिक पटेलने जनतेच्या मुद्द्यांवरुन मोदी सरकारला वेळोवेळी धारेवर धरले त्यासाठी अनेकदा उपोषण, आंदोलने देखील केली आहेत. हार्दिक पटेलला काँग्रेसनें नेहमीच पाठिंबा दिला आहे.
लोकसभा निवडणूक लढवण्याचा हार्दिकचा विचार असेल तर त्याला आम्ही उमेदवारी देणार असल्याचं गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष भारतसिंह सोलंकी यांनी म्हटले होते. त्यामुळे काँग्रेसच्या पाठिंब्यावर हार्दिक पटेल आगामी लोकसभा निवडणूक लढवू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
COMMENTS