नवी दिल्ली – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं भाजपसोबत सेटिंग असल्याची जोरदार टीका पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी केली आहे. तसेच भेट ठरलेली असतानाही अण्णांच्या आंदोलनांकडे हार्दिक पटेल यांनी पाठ फिरवली आहे. याबाबत त्यांना विचारलं असता अण्णांचे आंदोलन म्हणजे भाजपसोबत सेटिंग असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच आंदोलन झाल्याचे दाखवून सरकार काही दिवसात त्यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचं हार्दिक यांनी म्हटलं आहे. तसेच इतर शेतक-यांचं आंदोलन दडपण्यासाठीच अण्णांनी आंदोलन केलं असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
दरम्यान केंद्र सरकार मला घाबरत असून अण्णांच्या आंदोलनात मला जाऊ दिले नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच मी मोदी विरोधी असल्यामुळे मला व्यासपीठावर घेऊ नका म्हणून भाजपने अण्णांना सांगितले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच अण्णांवर भाजपचा दबाव असून मी गेलो तर सरकार वेगळा निर्णय घेईल अशी भीती त्यांना असल्याचही हार्दिक पटेल यांनी म्हटलं आहे. तसेच अण्णा हजारे यांनी व्यासपीठावर जाण्यास अटी ठेवल्या असून अटी असतील तर आंदोलनाला पाठींबा कोणी देणार नाही. आंदोलनात शेतकरी आले नाहीत त्यामुळे हे कशामुळे होतेय याबाबत अण्णांनी विचार करायला हवा असंही हार्दिक पटेल यांनी म्हटलं आहे.
COMMENTS