मनमोहन सिंहांच्या काळात कसाबसह अनेक दहशतवाद्यांना फाशी दिली, त्यांना धोका नव्हता , मोदींना सतत धोका कसा ? – हार्दिक पटेल

मनमोहन सिंहांच्या काळात कसाबसह अनेक दहशतवाद्यांना फाशी दिली, त्यांना धोका नव्हता , मोदींना सतत धोका कसा ? – हार्दिक पटेल

मुंबई – गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी काही दिवसांपूर्वीच सांगलीमध्ये धनगर समजाच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावली होती. त्यानंतर आज पुन्हा ते महाराष्ट्र दौ-यावर आले असून रायगडमध्ये आयोजित केलेल्या संभाजी ब्रिगेडच्या 9 व्या अधिवेशनाला त्यांनी उपस्थिती लावली आहे. यावेळी बोलत असताना हार्दिक पटेल यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान मोदींना काही दिवसांपूर्वीच धमक्यांचे पत्र आली होती. यावरुन हार्दिक पटेल यांनी मनमोहन सिंहांच्या काळात कसाबसह अनेक दहशतवाद्यांना फाशी दिली, त्यांना धोका नव्हता , मोदींना सतत धोका कसा ? असा सवाल केला आहे. तसेच सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, शिवाजी महाराजांना चोरले, एक दिवस सांगतील आम्ही इंदिरा गांधींच्या विचारावर चालतो असा टोलाही हार्दिक पटेल यांनी लगावला आहे.

तसेच टीव्हीवर आमची प्रतिमा काय दाखवली याची चिंता नाही, आम्हाला शेतकरी, बेरोजगारांची चिंता असल्याचंही हार्दिक पटेल यांनी म्हटलं आहे. गुजरातचा सर्वात ढोंगी माणूस, ये आदमीसे बचके रहो अशी जोरदार टीकाही यावेळी पटेल यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे. गुजरात लुटला, जे चित्र दाखवलं जातंय गुजरात मॉडेल चुकीचं आहे. भीती, भूख आणि भ्रष्टाचार हे गुजरात मॉडेल असल्याचंही हार्दिक पटेल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शेतक-यानं कितीही मेहनत केली तरी तरी त्याची पुढची पिढी गरिबीतच मरतेय. इथे अदानी अंबानीला काहीच कमी पडत नाहीये. तसेच देशाचं संविधान, देशाच सीबीआय आणि देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रताली मराठा मोर्चावरही बोलत असताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. ५२ मोर्चे शांतीत निघाले तेव्हा काय मुख्यमंत्री डमरू वाजवत होते का? असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच भिमा कोरेगावला दलित विरूद्ध मराठा हा वाद रंगवला गेला. संभाजी बिग्रेडचं नाव खुप ऐकलं होत. याठिकाणी येण्याची संधी मला मिळाली. आज महाराष्ट्रात शेतक-यांची अवस्था वाईट आहे. आरक्षणाचा मुद्दा अजूनही सुटत नाही. राजा कसा असावा हे छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहून कळतं.

मराठा, धनगर आणि मुस्लिमांची आरक्षणाची मागणी होत आहे. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी का होतेय हे समजून घेतलं पाहिजे. मराठ्यांनी शांततेत मोर्चे काढले तेव्हा सरकारला किंमत कळली नाही. छत्रपतींचा अपमान करणा-यांना महाराष्ट्रभुषण पुरस्कार दिला जातो. मराठा आणि दलितांमध्ये गैरसमज पसरवले जात आहेत. महाराष्ट्रात आता छत्रपतींचा पुतळा बनतोय आणि त्यावर ही अता राजकारण सुरू झालय. महाराष्ट्रातील शेतकरी धर्मा पाटील यांनी आत्महत्या केली. ते आपण विसरलो. आत्ता कुठे जाऊन तो पुतळा तयार होतोय. जे लोक छत्रपतींचा राज्याभिषेक करायला तयार नव्हते ते आज आपल्यावर सत्ता करतायेत.

पटेलांची ही अशीच अवस्था आहे. गुजरातमध्ये सरदार पटेलांच्या नावावर १० वर्ष वेड्यात काढलं. आम्ही जेव्हा रस्त्यावर आंदोलन करतो तेव्हा आम्हाला देशद्रोही म्हटलं जात असल्याची टीकाही यावेळी हार्दिक पटेल यांनी केली आहे.मोदी के बारे मै तो हम भी पहले कहते थे देखो देखो कौण आया गुजरात का शेर आया, पर तब हमे समझ ना थी,  और जब समझ आयी तब तक तो मैय्या संग सब लुट कर चला गया था ! असं म्हणत त्यांनी मोदींवर जोरदार टीका केली आहे.

COMMENTS